pankaja munde : चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यापासून पक्ष संघटनेबरोबरच आगामी निवडणुकांमध्ये भाजपच कसा सरस राहिल याचे ते नियोजन करताना आपल्याला वेळोवेळी दिसत आहेत. यासाठी ते आवश्यक अशी पावलं उचलताना दिसत आहे. यासाठी ते ते पक्ष संघटन करत बावनकुळे हे राज्यभर दौरा करत असल्याचे दिसत आहे. (Chandrashekhar Bawankule On pankaja munde)
अशातच त्यांनी भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात असलेल्या पंकजा मुंडेंची घरी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. पक्षाकडून वेळोवेळी त्यांना डावलले जात असल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचे वेळोवेळी बोलून दाखवत आहेत. यावर त्यांनी पण त्या नाराज नाहीत आणि यापूर्वीही नव्हत्या, एवढेच नाहीतर त्यांनी आता भाजपासाठी पूर्ण वेळ काम कऱण्याचे आश्वासन दिल्याचे बावनकुळे यांनी यावेळी जाहीर केले आहे. त्यामुळे आता भाजप मुंडे हा वाद मिटल्याचे दाखवत पंकजा मुंडे पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रीय दिसणार का? याकडे आता जनतेचे लक्ष लागल्याचे दिसत आहे.
दरम्यान आगामी निवडणूकांसाठी शिवसेना व संभाजी ब्रिगेड यांची युती झाली आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. संभाजी ब्रिगेडला मागील वेळी 0.06 टक्के मते मिळाली होती. त्यांच्याशी परत युती करून उद्धव ठाकरे यांनी फुसका बार सोडला आहे, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले. शुक्रवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.