राजकारण

Chandrashekhar Bawankule : कर्नाटक सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानं स्थापित करावा अन्यथा...

कर्नाटक सरकारची पुन्हा मुजोरी पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कर्नाटक सरकारची पुन्हा मुजोरी पाहायला मिळत आहे. बागलकोट चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे. कर्नाटक सरकारनं अंधाऱ्या रात्री शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला. कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबी लावून पुतळा हटवला आला. कर्नाटक सरकारने पुतळा हटवल्याने स्थानिक पातळीवर संताप व्यक्त केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट केलं आहे. बावनकुळे म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं मुजोरी करत बागलकोट चौकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री हटवला आहे. हा संपूर्ण हिंदुस्थान आणि कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान आहे. कर्नाटकातील काँग्रेसची ही मुजोरी आम्ही सहन करणार नाही.

तसेच महापुरुषांचा सातत्यानं अपमान करणं हे काँग्रेसचं धोरण झालं आहे. कर्नाटक सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानं स्थापित करावा अन्यथा काँग्रेसला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असे त्यांनी ट्विट केलं आहे.

मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवस विशेष वाहतूक ब्लॉक

Latest Marathi News Updates live: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

हेल्दी आणि टेस्टी मुगाच्या लाडूची रेसिपी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विविध विधेयकांवर होणार निर्णय

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड