राजकारण

शरद पवारांबद्दल बावनकुळेंचे विधान म्हणजे महाराष्ट्राला लागलेला काळा डाग; सुप्रिया सुळेंचा घणाघात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : उद्धव ठाकरेंवर राष्ट्रवादीने जादूटोणा केलाय. शरद पवार भोंदूबाबा आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. याला आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे म्हणजे हे महाराष्ट्राला लागलेला काळा डाग आहे. हेच संस्कार भाजपचे आहेत का, असा घणाघात त्यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हर हर महादेव चित्रपटावरुन जितेंद्र आव्हाडांनी कुणालाही मारलेले नाही. चित्रपटाविषयी काय भूमिका आहे याच राज्य सरकारने उत्तर द्यावं. चित्रपटात महिलांबदल, बांदल कुटुंबाबाबत जे दाखवल ते अयोग्य आहे. ते छत्रपतींशी एकनिष्ठ होते. विश्वासू होते, सत्य आहे ते दाखवले पाहिजे. तसेच, छत्रपती यांचा एकेरी उल्लेख दाखवणे हे अपमान आहे. इतिहासकारांना बसवूया. आम्हाला राजकारण करायचे नाही. गलत है वो गलत है, छत्रपती विरोधी सिनेने खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराच त्यांनी दिग्दर्शक-निर्मात्यांना दिला आहे.

शरद पवारांबद्दल चंद्रकात बावनकुळे यांचे विधान दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. अंधश्रद्धेच्या विरोधात आपण सगळे लढतो. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा प्रकारचं विधान करतात म्हणजे हे महाराष्ट्राला लागलेला काळा डाग आहे. वडीलांच्या वयाच्या माणसाबद्दल अस बोलणे यातून त्यांची संस्कृती दिसते. हेच संस्कार भाजपचे आहेत का? राजकारणात बोलताना लहान मोठे कुणीही असो, कस बोलायचं याचे संस्कार मला आई-वडिलांनी दिलेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जर अंधश्रद्धेबद्दल बोलत असतील तर विज्ञान विषयी काय बोलणार? ही त्यांची विचार करण्याची छोटी पद्धत आहे, हे जिवंत उदाहरण आहे, असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात की विरोधक रोज शिव्या घालतात. मात्र, हेच काँग्रेसला बोलत असतात. कालच बारामतीला एक केंद्रीय मंत्री येऊन गेले ते इतके भयाण बोलले की मला हसू आवरेना. हास्यास्पद विधान केलं. त्यांना सांगायचं की तुमचेच मोदी, जेटली आणि मोठे नेते आमच्याकडे येऊन गेले, अशी टीका प्रल्हाद पटेल यांच्या बारामती दौऱ्यावर सुळेंनी केली.

भारत जोडो यात्रा अतिशय चांगला उपक्रम आहे. मला सहभागी होऊन कृतज्ञता वाटली. राहुल गांधी यांना खूप प्रेम मिळत आहेत. लोकांच्या फार अपेक्षा आहेत. सगळं दडपशाहीने होत नसते. माझ्या शुभेच्छा सत्ताधाऱ्यांना आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

गजानन कीर्तीकर यांनी शनिवारी शिवसेनेला धक्का देत शिेद गटात प्रवेश केला. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गजानन कीर्तिकार हे चांगले आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. त्यांच्याविषयी मी काहीच बोलणार नाही. पण, त्यांनी जर काही वक्तव्य केले असेल तर ते दुर्दैवी आहे. ते कोणत्याही पक्षात जात असतील तर तो त्यांचा वैयक्तीक निर्णय आहे, असे त्यांनी सांगितले.

संजय राऊत आणि भास्कर जाधव यांनी मध्यावधी निवडणुकीचे भाकीत वर्तविले आहे. याबाबत बोलताना सुप्रिय सुळे म्हणाल्या, मध्यावधी लागूही शकतात. निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयार असतात. सत्तेत असणारे लोक आरोप आणि कार्यक्रम करण्यात व्यस्त आहेत, असे टोलाही त्यांनी शिंदे-फडणवीस सराकारला लगावला आहे.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?