कल्पना नळसकर | नागपूर : पाटण्यात विरोधी पक्षांची आज बैठक होणार आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार हजर असतील. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. आता कितीही वज्रमूठ बांधल्या तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारत देशातील एक एक नागरिक मतदान करेल, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला उंची देण्याकरता काम करत असताना दुसरीकडे विरोधक पाटणाला एकत्र येतात आहे. आणि एकत्र येऊन काय करतात आहे त्यांच्या मुलाबाळांची चिंता करण्याकरता एकत्रीकरण सुरू आहे. सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान करायचा आहे. तर शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना पुढे करायचा आहे. उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे यांना पुढे करायचा आहे. त्यामुळे विरोधकांनी एक मूठ बांधले आहे, असा निशाणा बावनकुळेंनी महाविकास आघाडीवर साधला आहे.
जनता ओळखून आहे. 2014 ला हेच झाला आणि 2019 झालं पण हेच केलं पण काही झालं नाही. आता कितीही वज्रमूठ बांधल्या कोणतेही मूठ बांधली तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातले सर्वोत्तम नेते, जगातील प्रथम पंतप्रधान आणि जगातील सगळ्यात उत्तम व्यक्तिमत्त्व म्हणून उभे राहिले आहेत. 2024 मध्ये संपूर्ण एनडीए फोर हंड्रेड प्लस झाल्याशिवाय राहणार नाही. भारत देशातील एक एक नागरिक पंतप्रधान मोदी यांना मतदान करेल, असे त्यांनी म्हंटले आहे
विरोधक एकत्र येतात कशासाठी एकत्र येतात. त्यांची पुढच्या भविष्यातली पिढी धोक्यात आलेली आहे. त्यांना असं वाटतं की आज आम्ही एकत्र नाही तर पुढील कुळ उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही केलेले गैरव्यवहार आम्ही केलेले काळे धंदे केले आहे ते उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकीकडे आपल्या पुढच्या पिढ्यांची संरक्षण करण्यासाठी ते एकत्र येत आहेत. त्यांना देश हित नाही आहे. यांना समाजाच्या शेवटच्या लोकांच्या समाज हाताशी देणंघेणं नाही. इथे पैशापासून सत्ता सत्तेपासून पैसा आहे यांचा समीकरण आहे. आपल्या मुलांना मोठा करण्यासाठी म्हणून या ठिकाणी या मूठ बांधण्यात येत आहे. पण ही मूठ सैल करण्याचं काम 140 कोटी जनता करणार आहे, अशी टीका त्यांनी विरोधी पक्षांवर केली आहे.