राजकारण

मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केले; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान

Chandrakant Patil यांनी उघडपणे मनातील खदखद व्यक्त केली

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात अभूतपूर्व बंडानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. परंतु, भाजपच्या (BJP) हे अद्यापही पचनी पडलेले दिसत नाही. याबद्दल वेळोवेळी भाजपकडून विधानेही करण्यात आली आहेत. अशातच आज थेट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उघडपणे मनातील खदखद व्यक्त केली आहे. मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केल्याचे मोठे विधान पाटील यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पनवेलमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकरीणीची आज बैठक सुरु आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केले. असो आगामी कााळात आपण खूप परिश्रम घेऊ. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन कार्यंकर्त्यांना केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी उघडपणे नाराजी दर्शविल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसेच, मागील अडीच वर्षामध्ये आपल्याला उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्यावर केसेस टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु, आपण पुरुन उरलो, असेही म्हंटले आहे.

याआधीही शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी शेवटी तुम्ही स्वतःचं सरकार आणून दाखवलं. या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांचा आम्हाला आदर आहे. पण, आमच्या मनात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत, असे वक्तव्य केले होते. यामुळे भाजप जन नाराज असल्याचे दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गट काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत उभी फुट पडली. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली. परंतु, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी घोषित केल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. तसेच, आपण मंत्रिमंडळात सहभागी न होता बाहेरुन सहकार्य करण्याची भूमिका फडणवीसांनी घेतली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी