Chandrakant Patil Team Lokshahi
राजकारण

Chandrakant Patil : लिहून ठेवा 2024 ला विधानसभेला 170 जागा

चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले भाकीत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कोल्हापूर : राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपचा (BJP) विश्वास द्विगुणित झाला आहे. अशातच लिहून ठेवा 2024 ला 42 ते 43 खासदार आणि विधानसभेला 160 ते 170 जागा जिंकणार, असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी वर्तविले आहे. धनंजय महाडीक यांच्या विजयानंतर कोल्हापूरात रविवारी जल्लोष रॅली काढण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, 2024 ची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत. या निवडणुकीत 2024 ला 42 ते 43 खासदार आणि विधानसभेला 160 ते 170 जागा जिंकणार हे लिहून ठेवा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेताना चंद्रकांत पाटील म्हंटले, ईडी हातात द्या, फडणवीस सुद्धा मतदान करतील हे वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, असे म्हणून ते पुढे म्हणाले, आमदारांना नोकर समजता का, बोलवून दम देता, विकास निधी रोखता मी स्वतः याबाबत पिटीशन दाखल करणार, असेही पाटलांनी सांगितले आहे.

तर, भागवत कराडांच्या कार्यालयासमोरील राडा असमर्थनीय आहे. समर्थक कोण आणि कोणाचे आहेत पाहणे गरजेचं आहे. पंकजा ताईंवर खरे प्रेम करणारे कार्यकर्ते असतील. तर ते अशी कृत्ये करून पंकजा ताईंची प्रगती रोखत आहेत. पक्ष त्या गोष्टींना एंटरटेन करणार नाही, असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांना यंदाही संधी न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक नाराज झाले असून वेगवेगळ्या माध्यामातून ते संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पंकजा मुंडे समर्थकांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी