शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण ताकदीने पहिल्यांदाच औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात आज सभा पार पडली. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेला 8 जून रोजी 37 वर्षे पूर्ण होत आहे.
या निमित्ताने होणाऱ्या 'हिंदुत्वाचा हुंकार' या घोषवाक्यासह मुख्यमंत्र्यांच्या सभेचा जोरदार प्रचार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी जनसागर लोटल्याचे पहायला मिळत आहे. औरंगाबादेत शिवसैनिकांची तुफान गर्दी सभेवेळी पहायला मिळाली. यावेळी शिवसेना नेत्यांसह पदाधिकारी उपस्थित होते. (chandrakant khaire on bjp leader kirit somaiya aurangabad)
यावेळी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर तोफ डागली. पाच वर्षे भाजपची सत्ता असताना त्यांनी औरंगाबादसाठी काय केलं? भाजपकडून फक्त शिवसेनेला बदनाम करण्याचं काम केलं जात आहे, किरीट सोमय्या यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. “मुख्यमंत्र्यांविषयी बोलाल तर थोबाड लाल करू”, असा त्यांनी इशारा यावेळी बोलताना दिला.