Ramdas Athawale Team Lokshahi
राजकारण

मनसे भाजप युतीला माझा विरोध आहे- रामदास आठवले

राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिका ह्या अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना सोबत घेणं भाजपला न परवडणारं आहे.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा चांगलीच चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यान स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. त्या विधानावरून राज्याच्या राजकारणात एकच गदारोळ सुरु झाला आहे. त्यावरच अनेक राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया येत असताना त्यावरच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर विखारी टीका केली आहे. यासोबतच आता रामदास आठवले यांनी मनसे युतीवर देखील भाष्य केले आहे.

काय म्हणाले आठवले?

मनसे भाजप युतीला माझा विरोध आहे, राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिका ह्या अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना सोबत घेणं भाजपला न परवडणारं आहे. मी सोबत असताना राज ठाकरे यांची आवश्यकता नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. आगामी निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदे गटांसोबत युती करून आम्ही निवडणूक लढणार आहे. आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत आम्हाला यश मिळेल. आम्ही एकनाथ शिंदेंचा पाठीशी आहोत.

पुढे ते म्हणाले की, राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्यावर टीका करून कोणाच्या भावना दुखवू नयेत. वैचारिक , मतभेद असू शकतात,अशी टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधींनी सध्या भारत जोडण्यापेक्षा काँग्रेस पक्ष जोडण्याच काम करावं, काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला आहे, त्याच काँग्रेसला बळकट करण्याचे काम त्यांनी करावे. राहुल गांधींच्या यात्रेत लोक गर्दी करत आहेत पण अशी गर्दी जमत असते. याच मतात परिवर्तन होईल अस अजिबात वाटत नाही. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला लोक जमा होत आहेत पण याचा फटका आम्हाला बसणार नाही. असे आठवले यावेळी म्हणाले.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट