Ravindra Chavan | Kalyan Dombivli | water problem team lokshahi
राजकारण

27 गावातील पाणी प्रश्न मार्गी लावणार, कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाणांची ग्वाही

रक्षा बंधनाच्या दिवशी बहिणांना पाणी देण्याची रविंद्र चव्हाणांची हमी

Published by : Shubham Tate

डोंबिवली (अमजद खान) - बारवी धरणाची उंची वाढवण्यात आलेली आहे. त्यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे पाठपुरावा केला. धरणातील पाणी लिफ्ट करुन कल्याण डोंबिवलीसह ग्रामीण भागाला आणले पाहिजे. त्यासाठी मोठय़ा व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. हे काम संथ गतीने सुरु आहे. त्याला गती देऊन 27 गावातील पाणी प्रश्न सोडवण्याचे काम करणार असल्याची ग्वाही कॅबीनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. (Cabinet Minister Ravindra Chavan's testimony will solve the water problem in 27 villages)

भाजपच्या वतीने भोपर येथे आयोजित रक्षा बंधन कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री चव्हाण आणि शशिकांत कांबळे उपस्थित होते. या प्रसंगी चव्हाण यांनी उपरोक्त ग्वाही दिली. जमलेल्या सगळ्य़ा बहिणांना रक्षा बंधनाच्या दिवशी पाणी देण्याची हमी चव्हाण यांनी दिली. भोपर, देसलेपाडासह 27 गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काही महिन्यापूर्वी भाजपने मोर्चा काढला होता. त्यानंतर प्रशासनाने या ठिकाण पाणी समस्या सोडवण्याकरता टेंडर काढण्यात आलेले आहे.

त्याठिकाणी पाण्याच्या टाक्या स्टील की प्लास्टीकच्या असाव्यात याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. या विषयी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांची भेट घेऊन हा निर्णय तातडीने घ्यावा. नागरिकांना पाण्याच्या टाक्या बांधून द्याव्यात. त्याचबरोबर एमएमआरडीए रिजनमध्ये वाढते नागरिकरण लक्षात घेता. या भागातील कुशिवली आणि काळू धरण यांचा रखडलेला प्रश्न आहे. हा प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येईल असेही आश्वासन कॅबिनेट मंत्री चव्हाण यांनी दिले आहे.

मंत्री पदाची शपथ घेताच कॅबीनेट मंत्री चव्हाण यांचा डोंबिवलीत भव्य सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी आज भोपर येथे पार पडलेल्या महिलांच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result