राजकारण

Budget 2023 : शिक्षण सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ; विद्यार्थ्यांसाठीही मोठी घोषणा

विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीत मोठी वाढ मिळणार आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अमृतमहोत्सवी वर्षात देवेंद्र फडणवीस प्रथमच बजेट मांडत आहेत. अर्थसंकल्प पंचामृतांवर आधारलेला असल्याचे फडणवीसांनी सभागृहात सांगितले. विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीत मोठी वाढ मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना आता मिळणार शिष्यवृत्ती भरीव वाढ करण्यात आली आहे. 5 ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना 1000 वरुन 5000 रुपये तर, 8 ते 10 वीसाठी 1500 वरुन 7500 रुपये वाढ करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देण्याची घोषणा फडणवीसांनी केली.

तसेच, शिक्षण सेवकांना मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. सरासरी 10 हजार रुपयांची वाढ देण्याची घोषणा केली. यानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक 6 हजारवरुन 16 हजार रुपये, माध्यमिक शिक्षण सेवक 8 हजारवरुन 18 हजार रुपये, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक 9 हजारवरुन 20 हजार रुपये देण्यात येणार आहेत. विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे केली जाणार आहेत.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती