यवतमाळ ओबीसी समाजाच्या मतावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना ओबीसी समाजाच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गोर सेनेच्या वतीने खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड, आमदार मदन येरावार यांच्या घरासमोर काळे झेंडे दाखविण्यात आले.
ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी. लोकसंख्येचा प्रमाणात वाटा देण्यात यावी, नवी मुंबई विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे. 27 टक्के आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, भटक्या विमुक्त समाजाचे पदोन्नतीमधील आरक्षण कायम करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.