राज्यात राजकीय गोंधळ सुरु असताना, दुसरीकडे राजकीय वर्तुळात वेगवेगळे समीकरण उदयास येण्याची शक्यता झाली आहे. कालच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याभेटीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आलं होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत विचारले असताना त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यावरूनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
ओवैसींनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत नकार दिल्यानंतर त्यावरूनच आता बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ओवैसी जर उद्धव ठाकरेंकडे जाणार नसतील तर सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेच ओवैसीकडे जातील. ज्या समाजवादी पक्षाने रामचरित मानस जाळलं, त्या सपाचे नेते उद्धव ठाकरेंना भेटायला गेले आहे. उद्धव ठाकरेंना काय म्हणावं उद्धव ठाकरेंनी किती खालची पातळी गाठली आहे. मी शंभर टक्के सांगतो ओवैसी जरी यांच्याकडे नाही आला, तरी हे ओवैसी कडे जातीलच. उद्धव ठाकरे यांची एवढी वाईट स्थिती होईल असं महाराष्ट्राने विचारही केलं नव्हतं. सत्तेच्या लालसे पायी उद्धव ठाकरे ओवैसीकडे जातील. अशी बोचरी टीका बावनकुळेंनी यावेळी केली.