राजकारण

...अन्यथा माझाही जय श्रीराम झाला असता : भाजप आमदार

मुंबईतील खड्डयांवरुन अधिवेशनात भाजप आमदारांचा सरकारला सवाल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पावसाचा पुन्हा एकदा जोर वाढल्याने मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्याही वाढली आहे. यामुळे अपघात वाढले असून अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे. मुंबईतील बोरीवली येथील नॅशनल पार्कसमोर भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. यावर आज भाजप नेत्या मनिषा चौधरी यांनी अधिवेशनात सवाल उपस्थित केले.

बोरिवली येथील अपघातात काल दोन जणांचा मृत्यू झाला. मीही त्या रस्त्यांवरुन प्रवास करताना थोडक्यात बचावले अन्यथा माझेही जय श्रीराम झाले असते. या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे दिसत नाहीत. रस्ते व्यवस्थित नसताना आयआरबी कसला टोल वसुली करत आहेत. या कंपन्यांवर काय कारवाई करणार, असा सवालही त्यांनी विचारला.

दहीहंडीमुळे मोठ्या संख्येने गोविंदा पथके मुंबईत येणार आहेत. अशात रस्त्यांवरील खड्डयांमुळे अपघातांची शक्यता आहे. यामुळे तातडीने खड्डे भरण्याची गरज आहे, अशी मागणी मनिषा चौधरी यांनी केली आहे. दरम्यान, मनिषा चौधरी यांच्या प्रश्नावर लवकरच सर्व रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्याचे उत्तर शिंदे सरकारकडून सभागृहात देण्यात आले.

काय आहे प्रकरण?

बोरिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर डंपरखाली येऊन एका तरुण जोडप्याचा बुधवारी दुर्दैवी मृत्यू झाला. हे जोडपे पश्चिम द्रुतगती महामार्गावरुन जात असताना बोरिवली नॅशनल पार्कसमोर असलेल्या खड्ड्यामध्ये त्यांच्या दुचाकीचं चाक अडकलं. यामुळे दोघेही दुचाकीवरुन खाली पडले. त्याचवेळी मागून भरधाव डंपरखाली आले. आणि या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण