पुणे : भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. त्या 57 वर्षाच्या होत्या. गेल्याकाही वर्षांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. अखेर त्यांची आज प्राणज्योत मालवली.
मुक्ता टिळक कॅन्सरशी लढा देत होत्या. मागील आठ ते दहा दिवसांपासून त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, त्यांची झुंज अखेर अयशस्वी ठरली व आज साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुक्ता टिळक यांचे पार्थिवाचे उद्या सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांची पणतू सून होत्या. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या विद्यमान आमदार होत्या. त्या ४ वेळा नगरसेवक राहिल्या होत्या. मुक्ता टिळक यांनी सन २०१७ ते २०१९ या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले होते. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअर अॅ म्ब्युलन्सनं नेण्यात आलं होतं.