राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक रोज कुठल्या ना कुठल्या कारणांवरुन एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत असतात. हा सर्व गदारोळ सुरु असताना भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँगेसचे नेते अनिल देशमुख यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणुकाआधी अनिल देशमुख हे भाजपमध्ये येण्यास इच्छुक होते. त्याबाबत त्यांनी आमच्याशी बोलणे सुद्धा केले होते. असा मोठा गौप्यस्फोट गिरीश महाजनांनी केला. नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
नेमका काय केला महाजनांनी गौप्यस्फोट?
माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांची भाजप मध्ये येण्याची इच्छा होती. निवडणूकी आधी त्यांनी किती वेळा मला भाजपात घ्या अशी विनवणी केली होती. निवडणुकांआधी त्यावेळी येणाऱ्यांचा लाईनमध्ये ते पण होते. भाजपकडून मला तिकीट द्या असे ते म्हणाले होते. परंतु, राष्ट्रवादीकडून ते निवडणूक लढले आणि गृहमंत्री झाले. आम्ही आश्चर्यचकित झालो की, किती नशीबवान आहे. आम्ही घेतलं नाही आणि ते तिकडे गेले आणि गृहमंत्री झाले. नशिबवान आहेत ते. परंतु, त्यांना विचारा त्यांनी कितीवेळा विनवणी केली. पण आता आता झालेले बोलून काही फायदा नाही. त्यांना एवढच सांगतो. की, आपली चौकशी सुरु आहे. त्यावर लक्ष द्या. बेलवर आहेत जशी जशी चौकशी होईल तेव्हा आपले काही म्हणणं असेल ते ईडीसमोर ठेवा. असे गिरीश महाजन यावेळी म्हणाले.