बीड : मी नाराज नाही. मी काय पदर पसरुन कोणापुढे मागायला जाणार नाही. 2024 निवडणुकीच्या तयारीला लागले आहे, असे भाजपच्या फायर ब्रँड नेत्या पंकजा मुंडे यांनी आज म्हंटले आहे. पंकजा मुंडे यांनी आज बीडच्या सावरगावमध्ये दसऱ्या निमित्ताने आपल्या समर्थकांना संबोधित केले. यावेळी त्यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही. खासदार प्रीतम मुंडे यांनी पंकजा मुंडे मंत्रिमंडळात हव्या होत्या अशी इच्छा बोलून दाखवली होती. यावर पंकजा मुंडे यांनी मेळ्वायत भाष्य केले आहे.
पंकजा मुंडे यांनी भाषणाला सुरुवात करतानाच हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे. माझ्यावर ज्यांनी टीका केली तरी मी कधीही त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली नाही. आरोप केले नाहीत. कारण आमच्या रक्तात नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
मंत्रीपदाच्या नाराजींच्या चर्चांबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्याबद्दल चर्चा होत आहे. परंतु, हकीकत को तलाश करना पडता आहे. अफवाहे घरबैठे मिल जाती है. जे काही आहे ही गर्दी सांगत आहे. संघर्षाच्या घोषणा बंद करा. संघर्ष सर्वांनाच आयुष्यात असतो. कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचे कधीच नाव झाले नाही. मी रुकणार नाही कोणासमोरही झुकणार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मला सांगितले की, तुमची गर्दीच तुमची ताकद आहे, जे.पी नड्डा यांनी सांगितले. अमित शहा दोन वेळा आले. त्यांनी सुद्धा हेच म्हटलं आहे. माझ्या लोकांची गर्दी हेच माझं प्रेम आहे. मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही. तर, गोपीनाथ मुंडेंनी दीनदयाळ उपाध्यायचा झेंडा हातात घेतला. त्यांचा वारसा चालवते. अटलबिहारी वाजपेयी यांचा वारसा चालवते. मी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा वारसा चालवते. त्यांचा वारसा चालविणे चुकीचे आहे, असे सवालही पंकजा मुंडेंनी विरोधकांना विचारले आहे.
पंतप्रधान मोदींवर टीका करत असल्याचा व्हिडीओ मध्यतंरी व्हायरल झाला होता. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार घेऊन मी वारसा चालवत आहे. त्यांनी 370 कलम आणले, जे या देशाला शक्य नाही ते करून दाखवलं. या देशात बहुमतात सरकार आणून दाखवलं. कुणी मोबाइलमध्ये अर्धवट क्लिप तयार करतात. पण, मी शत्रू विषयी वाईट बोलत नाही. तर, मी ज्यांच्या विचारांचा वारसा चालवते, त्यांच्याविरोधात बोलणे माझ्या रक्तात नाही. . मी मोदींच्या संस्कारात वाढलेले आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. समाज बांधायचा सोडून कोणी भिंती उभ्या करत असेल तर क्षमा मिळणार नाही. मी क्षमाशील आहे.
नेत्याला पद मिळावे अशी कार्यकर्त्यांची असेल. तर यात काय चूक आहे. आपण राजकारण करत असताना पद, श्रेष्ठता, प्रतिष्ठा यामध्ये मानवतेचे कल्याण विसरले नाही पाहिजे. मी खुर्चीवर विराजमान होण्यासाठी राजकारणात असेल तर येथे दोन माणसेही दिसणार नाही. जर तुम्ही लोकांना प्रेम दिले नाही तर खुर्च्या रिकाम्या राहतात. खुर्ची म्हणजे एक पद आहे. पण आता माझ्याकडे काही पद आहे नाही. ज्यांनी निवडणूक लढली त्यांना संधी नाही हे मला माहित आहे. म्हणून मी गप्प बसले. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत. ज्यांनी निवडणूक लढली नाही त्यांना संधी दिली. जे पडले त्यांना दिली. परंतु, याची उत्तरे मला द्यायचीच नाही. हे सगळे आले तर पक्ष वाढेलच, असे त्यांनी म्हंटले आहे.
मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यावर बोलतना त्या म्हणाल्या की, मला पद मिळाले नाही. माझी कोणतीही तक्रार नाही. मी हात जोडून विनंती करते की हे विषय बंद करा. देशातील राजकारणी ज्या कुशीतून आले. त्याच कुशीतून मीही आले आहे. मी सुध्दा 17 वर्ष राजकारण केले आहे. व्यक्तीपेक्षा संघटना मोठी आहे. हा नियम सर्वांवर लागू आहे. व मीही तो मान्य करते. पुढे कोणत्याही आमदाराची यादी आली तर माझे नाव घेऊ नका. मी 2024 च्या निवडणुकीला लागले आहे. मी नाराज नाही. हे काय घरगुती भांडण आहे का राजकीय आहे. तुमच्या लेकीच्या वाट्याला संघर्ष आला आहे. पचावयला शिका, असे मुंडेंनी म्हंटले आहे.
माना की ओरो की मुकाबले कुछ पाया नही हमने लेकीन ओरो की गिरा के कुछ उठाया नही हमने, असे म्हणत पंकजा मुंडे म्हणाल्या की, 2024 निवडणुकीला मी माझ्या परळी मतदारसंघात पक्षाने तिकीट दिले तर लढणार आहे. जरुरतसे ज्यादा इमानदार हूं मैं इसलिये सबकी नजरो मै गुन्हेगार हूं मै. मला पक्षाला त्रास द्यायचा नाही. कोणत्याही नेत्याला काही बोलयच नाही. आपण आपल शांत राहायचं. मी दुर्गेचे रुप धारण करण्याची तुमची इच्छा आहे. ते मी करु शकते. पण, थांबा आपण तयारी करु. एकदा आपण समपर्ण करुन दाखवले आहे. त्यामुळे समपर्णाची ताकद काय असते हे दाखवूच देऊ. यामुळे 2024 च्या तयारीला लागा. ज्योतीतून यज्ञ आणि थेंबातून सागर कसा बनतो ते दाखवूच. झोकून देऊ कामासाठी आणि स्वाभिमानाचे राज्य उभे करु. मी काय पदर पसरुन कोणापुढे मागायला जाणार नाही, हे सांगताना पंकजा मुंडे भावूक झाल्या होत्याय
जितने बदल सकते थे बदल खुदको लिया हमने अब जिनको शिकायत हे वो खुदको बदले. मी तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करणार आहे. गोपीनाथ मुंडे या नावाला बट्टा लागेल असे वागणार नाही. मी उतणार नाही मातणार नाही. घेतला वसा सोडणार नाही. मी तुमच्यासोबत काम करणार आहेत. तुम्ही कोणीही पदाची अपेक्षा करायची नाही, असेही आवाहन पंकजा मुंडे यांनी शेवटी कार्यकर्त्यांना केले आहे.