nitesh rane  Team LOkshahi
राजकारण

रमेश लटके जर जिवंत असते तर ते शिंदेंसोबत असते- नितेश राणे

प्रवासा दरम्यान स्वत: रमेश लटके यांनी मला त्यांना किती मानसिक त्रास सुरू आहे हे सांगितलं

Published by : Sagar Pradhan

राज्यात मागील काही दिवसांपासून प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच शिंदे गट आणि ठाकरे गट नव्या नाव आणि चिन्हासह बंडखोरीनंतरच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे दोन्ही गटासह भाजपने सुद्धा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. दरम्यान, आज अंधेरी पोटनिवणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आणि ठाकरे गट मोठ्या शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. यावेळी अनेक मोठ्या नेत्यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधतांना म्हणाले की, लोकांमध्ये 24 तास काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपाने उमेदवारी दिली. ही गर्दी म्हणजे आमच्या मुरजी भाईंच्या कामाची पोहोचपावती आहे. मला विश्वास आहे की जसं आता वातावरण आहे. तसंच निवडणूक झाल्यावरही दिसेल. या भागाचे रमेश लटके जर जिवंत असते तर ते एकनाथ शिंदेंसोबत असते. असंही यावेळी राणे बोलताना म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यांना स्वत:चा पक्ष वाचवता आला नाही, चिन्ह वाचवता आलं नाही. ते वडिलांच्या आजारावेळी आदित्य ठाकरे बाहेरगावी पार्ट्या करत होते. एकदा प्रवासा दरम्यान स्वत: रमेश लटके यांनी मला त्यांना किती मानसिक त्रास सुरू आहे हे सांगितलं. त्यांचे फोन मातोश्रीवर उचलण्यात येत नव्हते, असा गंभीर आरोप देखील राणे यांनी केला.

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे