महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर काल पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आली. याच पंतप्रधानांच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. मोदींची काळजी वाटते त्याच्याकडे कोणी नेते नाहीत. त्यांच्याशिवाय भाजपकडे चेहरा नाही. असे त्या म्हणाल्या होत्या. त्यावरच आता भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना निलेश राणे म्हणाले की, मला मोदीजींची काळजी वाटते - खासदार सुप्रिया सुळे पवार साहेबांना साडेसहा तालुक्यांच्या बाहेर कोण विचारत नाही म्हणून ही तुमची काळजी साहजिक आहे. मोदी साहेबांनी पवारांची घमेंड उतरवली एवढं मात्र नक्की. अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले आहे.
काय म्हणाले होत्या सुप्रिया सुळे?
महाराष्ट्रात पंतप्रधान येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. पण, भाजपला सरपंच ते पंतप्रधानांपर्यंत त्यांची गरज आहे. सुषमा स्वराज, अरुण जेठली यांच्याकडून शिकलो आहे. पण, आता भाजपकडे नेते नाहीत. मोदींची काळजी वाटते त्याच्याकडे कोणी नेते नाहीत. त्यांच्याशिवाय भाजपकडे चेहरा नाही, असा निशाणा सुप्रिया सुळे यांनी साधला आहे.