राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच शिंदे- फडणवीस सरकारचे नागपूरमध्ये पहिले हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र, या महाविकास आघाडीच्या काळात गाजलेले सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरेंना पुन्हा लक्ष्य करण्यात आलं आहे. आता हे प्रकरण प्रचंड तापले आहे. त्यावरच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे.
काय म्हणाले नारायण राणे?
सिंधुदुर्गमध्ये बोलताना नारायण राणे म्हणाले की, सुशांत सिंह आणि दिशा सालियानचं नाव आलं की आदित्य ठाकरे चवताळले. दिशा सालियन या एका भारतीय, महाराष्ट्रीय मुलीवर अत्याचार केला आहे, हत्या केली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे तिथं उपस्थित होते, सोडणार नाही. आता सत्ता भाजप आणि शिंदे गटाची आहे हे लक्षात ठेवा, असंही नारायण राणे म्हणाले.
विनायक राऊतांवर देखील साधला निशाणा
मला त्याचं नाव घेणे आवडत नाही, आमच्या जिल्हा हा खासदार शोभत नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण यांनी आज खासदार विनायक राऊत यांच्या वर सडकून टीका केली दोन लग्न केली म्हणजे लोकांची काम केली असं होत नाही ते तर वैयक्तिक काम झालं असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली.