राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच दुसरीकडे रत्नागिरी बारसू रिफायनरीवरून राजकीय वर्तुळात वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे बारसू येथे दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. हुकूमशाहीने रिफायरनरी प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न केला तर ती हुकूमशाही तोडून-मोडून टाकेन. आम्ही महाराष्ट्र पेटवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. त्यालाच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे.
काय दिले नारायण राणेंनी प्रत्युत्तर?
उध्दव ठाकरेंची आज रत्नागिरीत सभा होत आहे. त्याआधी आज नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आज उध्दव ठाकरे आले. नेहमीप्रमाणे बडबडले, सरकारला धमक्या दिल्या. महाराष्ट्र पेटवण अस काही तरी बोले. आज ते स्वत: हा कोण आहेत याची जाणीव आहे का? हा प्रश्न पडतो. शिवसेनेची अवस्था आज महाराष्ट्रात, देशात कमजोर पक्ष म्हणून आहे. ते पेटवण्याची भाषा कशी करू शकतात. अशी जोरदार प्रत्युत्तर त्यांनी दिले.
पुढे बोलताना त्यांनी उध्दव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करायला मंत्रालयात गेलो. तेव्हा मला तिथल्या स्टाफने सांगितले की, याआधीचे मुख्यमंत्री जास्त येत नव्हते आले तरी जेमतेम दोन तास बसायचं आणि हे चालले पेटवायला. कसं पेटवणार हेलिक्पॅटरमधून. मुख्यमंत्री असताना कधी मुख्यमंत्री असताना कधी कोकणातील लोकांची विचारपूस करायला गेले होते का? अतिवृष्टीचे पैसे मंजूर करून गेले ते आतापर्यंत दिले नाही. या महाराष्ट्राच्या इतिहासात एकमेव मुख्यमंत्री निकामी दोन तास येणारा मुख्यमंत्री, ज्याला विकास समजत नाही, अर्थसंकल्प समजत नाही. असा मुख्यमंत्री कलंक आहे म्हणजे उध्दव ठाकरे. मुख्यमंत्री असताना यांनी कोणताही प्रकल्प आणलेला नाही. कोकणाच्या विकासात त्यांचं काही योगदान नाही. हे कोकण वाढले यांच्यामुळे नाही. कोकणाचा कॅालिफोर्निया करू हेच लोक बोलायचे आम्ही ऐकायचो. कॅालिफोर्नियात 14 रिफायनरी आहे. मग इकडे का विरोध करतायत? असा सवाल त्यांनी केला.