नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मिळाला आहे. आधीच चालू असेलल्या वाद या निर्णयामुळे आता आणखीच तीव्र झाला आहे. दुसरीकडे यावरूनच टीका सुरु झाली आहे. यातच आता ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर गंभीर आरोप केला आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी 2000 कोटींचा सौदा झाल्याचा दावा त्यांनी केली आहे. असा आरोप राऊतांनी केला. त्यावरच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना टोमणा मारला आहे.
काय मारला सोमय्यांनी टोमणा?
संजय राऊतांच्या आरोपावर सोमय्यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. त्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, शिवसेना नाव आणि निशाण साठी ₹२००० कोटीचा सौदा झाला. असे संजय राऊत म्हणतात. मला आशा आहे की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कोर्टात याचीका करणार आहे, त्यात हा आरोप. माहितीचा उल्लेख करणार असा टोमणा त्यांनी मारला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी एक ट्विट करत शिंदे गटावर आणि भाजपवर मोठा आरोप केला आहे. माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असेही राऊतांनी म्हंटले आहे.