राजकारण

राऊतांना येरवड्याच्या मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज; भाजप नेत्याची जोरदार टीका

संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका, भाजप नेत्यांचे जोरदार प्रत्युत्तर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे फेकू नंबर वन आहेत. गुगलवर फेकू शब्द सर्च केला की मोदींचा चेहरा दिसतो, असा जोरदार घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाप्रबोधन यात्रेत केला होता. याला आज भाजप नेते जगदीश मुळीक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांना येरवड्याच्या मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, अशा शब्दात मुळीक यांनी राऊतांवर शरसंधान साधले आहे.

जगदीश मुळीक यांनी ट्विटरद्वारे संजय राऊतांवर टीका केली. शिशुपाल आता तुझा घडा भरला आहे. वेड्या माणसाकडे दुर्लक्ष करावे म्हणून संजय राऊत आणि त्यांची वक्तव्ये याकडे दुर्लक्ष करत असताना तो पंतप्रधान मोदींवर खालच्या पातळीची टीका करीत आहे. शिशुपाल चे 100 गुन्हे भगवान श्रीकृष्णाने माफ केले पण त्याचा पापाचा घडा भरला तेव्हा त्याला योग्य शिक्षा ही केली. तसेच संजय राऊतांचे झाले आहे.

मोदी हे भाजपचे नेते जरी असले तरी देशाचे पंतप्रधान आहेत व देशाचा अभिमान आहे. त्यांच्यावर आपली लायकी नसताना केलेली टीका म्हणजे संजय राऊतांचा पापाचा घडा भरत आला आहे हेच दर्शविते. उगाच लोकांची टाळकी भडकवण्या पेक्षा शिल्लक सेनेसाठी काही तरी कर, असा सल्लादेखील मुळीक यांनी संजय राऊतांना दिला आहे. संजय राऊत ना खरी गरज आहे ती आमच्या येथील प्रसिद्ध येरवडा मनोरुग्णालयात दाखल व्हायची, ती सोय आम्ही विनामूल्य करू, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, महाप्रबोधन यात्रेत संजय राऊतांनी मोदींवर हल्लाबोल केला होता. दोन हजारांच्या नोटांची बंडलं कुणाकडे असतील तर ती ५० खोकेवाल्यांकडे आहेत. भाजपाच्या शेठजी गौतम अदानींकडे आहेत. मात्र कष्टकरी, शेतकरी, मजूर यांची अवस्था बिकट आहे, अशी टीका संजय राऊत यांनी नोटबंदी निर्णयावर केली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे फेकू नंबर वन आहेत, असे त्यांनी म्हंटले होते.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड