राजकारण

खडसेंचे षडयंत्र घड्याळात कैद, लवकरच समजेल; गिरीश महाजनांचा इशारा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंमध्ये अनेक दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरु आहे. आता पुन्हा एकदा गिरीश महाजानांना एकनाथ खडसेंवर टीकास्त्र सोडले आहे. मला क्लीन चीट मिळाल्याचे एकनाथ खडसेंनी कितीही म्हटलं तरी मात्र आता सीआयडी, सीबीआय, अँटी करप्शनकडून खऱ्या अर्थाने एकनाथ खडसेंना क्लीन चिट मिळणार आहे, असा उपहासात्मक इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिला आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे सत्तेत असताना त्यांनी वाटेल ते केले. मात्र, खडसेंचे सत्य आता बाहेर येणार असून खडसेंनी कितीही छातीत ताणून सांगितलं की मला क्लीन चीट मिळाली. मात्र, छाती ताणू नका हाड मोडतील. छाती काढायची तुमची परिस्थिती राहिलेली नाही. कितीही जरी तुम्ही आव आणला तरी मात्र खऱ्या अर्थाने लवकरच सीआयडी, अँटी करप्शन कडून तुम्हाला क्लीन चिट मिळेल. तुमच्या कर्माची फळ तुम्हाला आता भोगावेच लागणार, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकार असताना माझावर मोका लावत खडसेंनी पेन ड्राईव्हचे षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप गिरीश महाजन यांनी केला असून खडसेंचे षडयंत्र हे घड्याळात कैद झाले असून त्याबाबत खडसेंची सीबीआय चौकशी सुरू आहे. सीबीआय चौकशीत लवकरच समजेल की खडसेंनी काय केलं, असा अप्रत्यक्ष इशारा ही गिरीश महाजन यांनी खडसेंना दिला आहे.

मागील निवडणुकीनंतर मंत्रीपदाचा गैरवापर करत एकनाथ खडसेंनी दूध संघ आपल्या ताब्यात ठेवला. सात वर्षात दूध संघाचं काय झालं हे सर्वांना माहिती. मात्र, दुधात, तुपात कोणी अपहर केला याचा जबाब अधिकाऱ्यांनी दिला आहे. दूध संघाच्या मागील निवडणुकीत एकता खडसे यांनी एक वर्ष अध्यक्ष पद घेणार असल्याचे म्हटले. मात्र, त्यावेळी एकनाथ खडसेंकडे अध्यक्षपद असल्याने मंत्री पदाचा गैरवापर करत सात वर्ष त्यांनी ते पद आपल्याकडे ठेवल्याची टीका मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर केली आहे. दूध संघाच्या अपहारातून कोणीही वाचणार नसल्याचाही गिरीश महाजनांनी म्हंटले आहे.

दरम्यान, याआधीही गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला होता. तुम्हाला एक मुलगा होता त्याचं काय झालं? आत्महत्या झाली की खून झाला हे तपासण्याची गरज आहे असे म्हणत मला जास्त बोलायला लावू नका, असे महाजनांनी म्हंटले होते. याला एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तरही दिले होते.

VidhanSabha Elections UBT: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले! छत्रपती संभाजी नगरसाठी "या" उमेदवारांची नावे आली समोर...

VidhanSabha Elections UBT: ठाकरे गटाकडून अजित पवारांना मोठा धक्का!ठाकरे गटात इनकमिंगला सुरुवात

Satish Chavan: आमदार सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीमधून 6 वर्षासाठी निलंबन

Sharad Pawar VidhanSabha Elections: इंदापुरात शरद पवारांना धक्का! इंदापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार...

मविआच्या मतदारांची नावे यादीतून वगळली- नाना पटोलेंचा गंभीर आरोप