राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्यावरून जुंपली आहे. याच दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी महिला सुरक्षावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाराष्ट्राने गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राने काय पाहिलं नाही? बलात्कार, सामूहिक बलात्कार, विनयभंग बघितले. अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
महाराष्ट्राने गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राने काय पाहिलं नाही? बलात्कार, सामूहिक बलात्कार, विनयभंग बघितले. शाहिस्तेखानाची बोट शिवाजी महाराजांनी छाटली हे इतिहासात वाचलं होतं, पण ठाण्यासारख्या ठिकाणी एका महिलेची बोटं देखील तोडली होती, अशा शब्दात भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 45 आणि विधानसभेला 288 पैकी 200 जागू, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनानंतर चित्रा वाघ पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, महिलांविरोधातील तक्रारी मोठ्या संख्येनं रजिस्टर व्हायला पाहिजेत. त्यामुळे महिलांची छेड काढणाऱ्यावर कारवाई करता येईल. नागरिकांनी देखील चुकीच्या घटना घडत असेल तर थांबून मदत करावी, पोलिस आणि सरकार आपलं काम करत राहणार आहे. कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या कामात कसूर केली असेल, तर त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल. असे त्या म्हणल्या.
नितेश राणे कोणत्या कार्यक्रमात बोलले किंवा त्यांचे काय वक्तव्य हे पाहिलेलं नाही. खरंच असं बोलले असतील, तर ते योग्य नाही. भाषण पूर्ण ऐकून प्रतिक्रिया देईन, असे त्या म्हणाल्या. भाजपचे नेते हेकडी नाहीत, सगळ्यांचे सल्ले ऐकून घेतले जातात. चांगला सल्ला असेल तर स्वीकारतात, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या पत्रावर दिली.