राजकारण

अजित पवार दिलगिरी व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत... : चंद्रकांत पाटील

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कोल्हापूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जोपर्यंत अजित पवार दिलगिरी व्यक्त करत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असे त्यांनी म्हंटले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजप नाही तर सर्व राष्ट्रीय संघटना ज्यांना राष्ट्र आपला वाटतो, इतिहास आपला वाटतो ते आज व्यक्त झाले. अजित पवार असे कसे स्टेटमेंट देतात? मलाही अधिवेशनात तेव्हा आश्चर्यच वाटलं. जोपर्यंत अजित पवार दिलगिरी व्यक्त करत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.

मिशन 2024 विषयी बोलताना चंद्रकात पाटील म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सभा महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशात होणार आहे. २० जानेवारीला ते शिरुर लोकसभा मतदारसंघात भोसरीमध्ये सभा घेणार आहेत. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना लोकसभा, विधानसभा एकत्र आम्ही लढवणार आहोत. २०२४ मध्ये ४०० जागांहून पुढे जायचे आहे. सहयोगी पक्षाला विजयी करणे आपले काम आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

तर, चंद्रपुर दौऱ्यावर असताना जे पी नड्डा यांनी बाबतुल्लाशाह दर्ग्याला भेट दिली. यावर विरोधकांनी टीका करण्यात सुरुवात केली आहे. यावर चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजप जो विचार घेऊन काम करते. हिंदू विचार भारतीय विचार घेऊन काम करते. सर्वधर्म समभाव हा हिंदू शब्दाच्या आशेत आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी या शब्दाचा वापर केला गेला. आज काल कसं झालंय, रोज उठून ५,६ जणांची टीम ठरली आहे. जर ते बोलले नाहीतर ते बेरोजगार होतील, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : सुरवातीच्या कलांनुसार महायुतीची मुसंडी

Wayanad Election Result 2024 : वायनाडमध्ये प्रियांका गांधी आघाडीवर; भाजपाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर

Marathwada Region Election Result 2024 : मराठवाड्यात जरांगे फॅक्टर कमी पडले का?

Kolhapur District Assembly Constituency : पहिल्या कलामध्ये जिल्ह्यात महायुतीची आघाडी!

Election Commission | निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गोंधळ, काँग्रेस आणि ठाकरे गटाचा कॉलमचं नाही