Jayant Patil Gopichand Padalkar team lokshahi
राजकारण

गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर जोरदार घणाघात

Published by : Shubham Tate

Jayant Patil Gopichand Padalkar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर अखेर आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक पार पडली. शिंदे सरकारने आपली पहिली लढाई जिंकली आहे. पण, शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये आता न्यायालयीन लढाई सुरू आहे. शिवसेनेने 39 बंडखोर आमदारांनी पक्षाचा आदेश मोडून मतदान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर शिंदे गटानेही 16 आमदारांविरोधात व्हीप मोडल्याची तक्रार केली आहे. आता हा वाद सर्वोच्च न्यायालयातच निकाली निघणार आहे. यावर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावरून भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. "सत्ता गेली पण माज जात नाही" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आदिवासी असूनही चांगलं काम केलं या विधानाचा अर्थ काय? जातीयवाद यांच्या मनात रुजलेला आहे. मी तमाम दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त बांधवांच्या वतीने या विधानाचा जाहीर निषेध करतो. सत्ता गेली पण माज जात नाही" असं पडळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अजित पवार यांना सध्या तरी जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारमध्ये असतानाही अजित पवारांच्या दौऱ्यांचा, कामाचा आणि भाषणांचा बोलबाला राहिला आहे. तसेच अजित पवारांचं आजचं विधानसभेतलं भाषणही चांगलेच गाजले आहेत. अजित पवारांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दीर्घ अनुभव आहे. सरकारला घाम फोडण्याची ताकद ही अजित पवार यांच्यात असल्याचे अनेक आमदारांचे मत आहे. तसेच विविध खात्यांच्या कामांचा अनुभव हा अजित पवारांच्या कामी नक्कीच येणार आहे. अजित पवारांची शिस्तही सर्वांनाच भावते, कधी कधी ते एखाद्या सभेच्या स्टेजवरून आपल्याच कार्यकर्त्यांना खडे बोलही सुनावताना दिसून येतात. त्यामुळे अजित पवारांचा हा धडाडीपणा आणि अनुभव पाहून त्यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडणार का? हे लवकच स्पष्ट होणार आहे.

साळीच्या लाह्या खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

जालन्यात मराठा - ओबीसी समाजाचं उपोषण; उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी समाजातील लोकांची गर्दी

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज कोकणात

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित