राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. तर दुसरीकडे या गोंधळा दरम्यान राज्यातील एकूण ७ हजार ७८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीच्या जल्लोष संपूर्ण राज्यभरात सध्या होताना दिसत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा आतापर्यंत जिंकल्या आहे. मात्र, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेचीबाब समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली आहे. 42 ग्रामपंचायतीमध्ये भाजप 20 तर शिंदे गट 13 असे स्थान मिळवले आहे.
ठाणे जिल्ह्यातील थेट सरपंच पदासाठी 34 ग्रामपंचायतीमध्ये 114 उमेदवारांसह 219 सदस्यांच्या जागांसाठी 613 उमेदवारांच्या अंतिम निकालात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. तर 42 ग्रामपंचायती पैकी 6 ग्रा.पं. चे सदस्य आणि सरपंच बिनविरोध झाले आहे.
ठाणे जिल्हा एकत्रित
42 ग्रामपंचायत
भाजप : 20
शिंदे गट : 13
ठाकरे : 5
अपक्ष : 2