सचिन बडे |ओरंगाबाद
औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात हजारो भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या गाडी जागा दिली जात नव्हती. यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (ravsahev danve)रस्तावर उतरुन कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले. त्यांनी भाजपचा (bjp)झेंडा घेत त्याच्या काठीच्या साह्याने कार्यकर्त्यांना बाजूला करत देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीला रस्ता करुन दिला.
गाडीसाठी केला रस्ता
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांचा औरंगाबादेत दे धक्का काम केले. रावसाहेब दानवे यांनी स्वतः मिरवणुकीच्या गाडीतून उतरून दिले कार्यकर्त्यांना पक्षाच्या झेंड्याने धक्के दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीला रस्ता देण्यासाठी त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी कार्यकर्त्यांना फटके दिले. फडणवीस यांच्या गाडीला रस्ता न दिल्याने रावसाहेब दानवे कार्यकर्त्यांवर भडकले.
औरंगाबादमध्ये पाण्यासाठी पैठण गेट ते क्रांती चौक दरम्यान मोर्चा काढला. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपचे कार्यकर्ते आणि औरंगाबादची जनता सहभागी झाली. या मोर्चाचं नेतृत्व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यानंतर आता ते औरंगाबादच्या जनतेला संबोधित करत आहेत. यावेळी दानवे यांनी सांगितले की, हा मोर्चा भाजपचा मोर्चा नाही, हा औरंगाबादकरांचा मोर्चा आहे. या मोर्चाला सर्वांनी पाठींबा द्यावा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना १६८० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली. पण भाजप-शिवसेनेची सत्ता होती पण आमची मतं चोरीला गेली पण आता चोर सापडला आहे. त्यामुळं सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या चोराला शिक्षा द्यायची आहे.