राजकारण

आमदार अपात्रताप्रकरणी मोठी अपडेट! सुनावणीचे वेळापत्रक ठरलं

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक ठरल्याची माहिती समोर आली आहे. 13 ऑक्टोबरला शिवसेनेच्या आमदारांच्या सर्व याचिका एकत्र करायच्या कि नाही, यावर सुनावणी पार पडणार आहे. अपात्रतेची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार असून सर्व याचिकांवरील सुनावण्यात एकत्रित घ्यायच्या की नाही, याबाबत 20 ऑक्टोबरला मोठा निर्णय होण्याची शक्यता आता वर्तण्यात येत आहे.

13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान कागदपत्रांची तपासणी होणार आहे. यानंतर 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तीवाद करण्यात येईल, त्याचबरोबर 23 नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होईल, अशी माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर आणि नाराजी व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 25 सप्टेंबर रोजी आमदार अपात्रतेची दुसरी सुनावणी घेतली होती.

BJP Vidhan Sabha Election Updates : भाजप सुमारे 153 जागांवर लढण्याची शक्यता

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस सतर्क

Radhakrishna Vikhepatil Meet Manoj Jarange Patil : राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

Radhika Apte Pregnancy : राधिका आप्टे होणार आई! एका फेस्टिव्हल दरम्यान फ्लॉन्ट केला बेबी बंप...

Vijay Wadettiwar : 'या' दिवशी येणार काँग्रेसची पहिली यादी विजय वडेट्टीवार म्हणाले...