राजकारण

Raj Thackeray : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अमित ठाकरेंना कॅबिनेट मंत्रिपद? राज ठाकरेंचा मोठा खुलासा

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचे सरकार स्थापन झाले. आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. त्यात नेमकं कुणाला मंत्रिपद मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच गुरुवारी सकाळी अमित ठाकरे यांना कॅबिनेटमध्ये घेण्याची ऑफर भाजपानं दिल्याची बातमी समोर आली. मात्र त्यावर आता खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी खुलासा केला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, ही बातमी धांदात खोटी असून खोडसाळ आहे. तसंच कोणीतरी जाणुनबुजून राजकीय वातावरण निर्माण कऱण्यासाठी आमच्या नावांचा वापर करत असल्याचंही म्हटलं आहे. राज ठाकरेंनी हे वृत्त पसरवणाऱ्यांवर नाराजीदेखील जाहीर केली आहे.

राज्यात सत्तांतर घडत असताना मनसेच्या एकमेव आमदाराने शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने विधानसभेत मतदान केले होते. तेव्हापासून मनसे राज्याच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होईल अशी चर्चा सुरू झाली. मनसेला २ मंत्री पदे दिली जातील असे बोलले गेले. परंतु त्यावर मनसेने कुठलेही भाष्य केले नाही. मात्र आता अमित ठाकरेंचे नाव पुढे आल्यानंतर याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित ठाकरे यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही आहेत अशी चर्चा सुरू होती. बुधवारी देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंची भेट घेणार होते. परंतु काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता अमित ठाकरेंच्या चर्चेबाबत राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून भाजपानं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठं आव्हान निर्माण केले आहे.

Bharat Gogawale : आमदार भरत गोगावलेंचा मोठा गौप्यस्फोट | Marathi News

Sangli : सांगली जिल्ह्यात पावसाचे थैमान; पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर

Navra Maza Navsacha 2 : "नवरा माझा नवसाचा २"ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद

Snake in the train: Garib Rath Express मध्ये चक्क साप | Marathi News

MIM MP Imtiaz Jaleel Organises Tiranga Rally: MIMची संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली