राजकारण

Nitin Gadkari : नितीन गडकरी धमकी प्रकरणात मोठी बातमी

Published by : Siddhi Naringrekar

कल्पना नळसकर- असूर, नागपूर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणी मागणे आणि ठार मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणाचा खटला मुंबईला स्थलांतरित केला जावा यासाठी एनआयए ने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले आहे. न्यायालयाने या अपिलावर सुनावणी करत राज्य सरकार व मुख्य आरोपी जयेश पुजारी यांना नोटीस बजावून यावर 30 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

एनआयए ने 15 जुलै रोजी नागपूरमधील विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून येथील न्यायिक रेकॉर्ड मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात स्थानांतरित करण्याची मागणी केली होती. तसेच नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशन मधील रेकॉर्ड ही मागितला. 18 जुलै रोजी विशेष सत्र न्यायालयाने न्यायिक रेकॉर्ड मुंबईला स्थानांतरित करण्याची मागणी नामंजूर केली. त्याविरुद्ध एनआयए ने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द करून येथील खटल्याचा रेकॉर्ड मुंबईला स्थानांतरित करण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती एनआयए ने केली आहे.

प्रधानमंत्री मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा अजित पवार यांच्याकडून बैठकीत आढावा

Pitru Paksha: पितृपक्षात कावळ्याला जेवण दाखवलं जाते, काय आहे पितृपक्षाशी कावळ्याचा संबंध? जाणून घ्या...

Laapataa Ladies: किरण रावच्या 'लापता लेडीज'ची 'ऑस्कर'साठी निवड; फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली पुष्टी

SL vs NZ: प्रभात सूर्याने रचिन रवींद्रची मेहनत घालावली वाया; श्रीलंकेचा न्यूझीलंडवर दमदार विजय

Navra Majha Navsacha 2 Movie Review: "नवरा माझा नवसाचा 2" यंदाच्या ट्रेनच्या प्रवासाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम