Bhaskar Jadhav | BJP | Shivsena  Team Lokshahi
राजकारण

शिवसेनेच्या नादाला लागू नका; राजकीय जीवनाची राख होईल, भास्कर जाधवांचा भाजपवर घणाघात

ज्याच्या खांद्यावर मान ठेवली; त्यांनीच केसाने गळा कापला

Published by : Sagar Pradhan

Bhaskar Jadhav on DevendraFadnavis : राज्यात सध्या राजकारण प्रचंड तापलेले असताना शिवसेना आणि शिंदे गट वाद उफाळून बाहेर येत आहे. दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट पुन्हा ऐकमेकांसमोर उभा ठाकले आहेत. या दरम्यान, नवनिर्वाचित शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ज्याच्या खांद्यावर मान ठेवली त्यांनी केसाने गळा कापला. शिवसेनेने आधीच मित्रपक्ष वाढवले असते तर आज भाजपने केलेल्या विश्वासघाताच दुःख वाटलं नसतं, अशी जोरदार टीका भास्कर जाधव यांनी भाजपवर केली. भास्कर जाधव यांची आज शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषेद घेत भाजपवर जोरदार निशाना साधला. (Bhaskar Jadhav attack on BJP DevendraFadnavis)

फडणवीसांना दिले प्रतिउत्तर

पत्रकार परिषेदेत बोलताना जाधव म्हणाले की, संभाजी ब्रिगेडप्रमाणे महाराष्ट्रातील इतर पक्षांसोबत शिवसेनेने युती करायला हवी, असं मतही जाधव यांनी व्यक्त केलं आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणत टीका केली होती. त्याला प्रयुत्युत्तर देतांना ते म्हणाले की, आम्हाला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणणाऱ्या फडणवीसांच्या पक्षाने आजवर अनेकांशी युती केली आणि दगा दिला. मात्र, शिवसेना एकासोबत कायम राहिली. त्यांच्या सारखा आम्ही मित्र पक्षांना दगा दिला नाही, अशी टीकाही त्यांनी भाजपवर करत मनातील खदखद व्यक्त केली.

शिवसेनेच्या नादाला लागू नका, राजकीय जीवनाची राख होईल

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राजकारण सुरू असताना त्यावर आता भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे गटावर जोरदार प्रहार केला आहे. प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, शिवसेना देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. 56 वा दसरा मेळावा घेण्याच्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असेल, एक चिन्ह एक झेंडा असलेला पक्ष म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना हा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे. कुणीही या निखाऱ्यात हात टाकण्याचा प्रयत्न करू नये. प्रयत्न करणाऱ्यांच्या राजकीय जीवनाची राख होईल. शिवसेनेच्या नादाला लागू नका, असा दमच त्यांनी शिंदे गटाला यावेळी भरल्याचे दिसत आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, संभाजी बिग्रेड आणि शिवसेना युतीचा भाजपने धसका घेतला आहे. 25 ते 30 वर्ष शिवसेनेने एकाच पक्षाच्या खाद्यावर विश्वासाने मान ठेवली होती. मात्र केसाने गळा कापण्याचे काम मित्र पक्षाने केलं, शिवसेनेशी युती असताना मात्र या पक्षाने अनेक पक्षाची युती केली आणि मित्र पक्षांना संपवले, अशी भाजपचं नाव न घेता त्यांनी टीका केली.

Economist Bibek Debroy passed away: ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन

नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; भेसळयुक्त 688 किलो मिठाई जप्त

Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात; म्हणाले...

'फडणवीसन यांच्या बाजूने असलेल्या लोकांना 'त्या' मदत करतात' राऊतांचा कोणावर निशाणा?

नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; भेसळयुक्त 688 किलो मिठाई जप्त