मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राजकीय वर्तुळातून यांवर अनेक प्रतिक्रिया देखिल येत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनोग जरांगे उपोषणाला बसले आहेत.
काही गावात मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश दिला जाणार नाही आहे. राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली असून मनोज जरांगे पाटलांना अनेक ठिकाणांहून पाठिंबा मिळताना दिसत आहे.
आज बीडमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता. मात्र आता हा कार्यक्रम बंद पाडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मराठा आंदोलकांनी हा कार्यक्रम बंद पाडला आहे. आरक्षण नाही तोपर्यंत सरकारचा कार्यक्रम होऊ देणार नाही. असे आंदोलकांनी म्हटले आहे.