विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राजन तेली आणि परशुराम उपरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यानंतर परशुराम उपरकर व राजन तेली यांचा भव्य सत्कार समारंभ कुडाळ येथे करण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर कणकवलीतील बॅनरबाजीनं राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजन तेली, परशुराम उपरकर यांच्या सत्कार सोहळ्यावर सवाल उपस्थित करत बॅनरबाजी केली आहे.
कणकवली तालुक्यात नांदगाव, तरेळे, कासार्डे या ठिकाणी लावण्यात आलेलं बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. 'आजचा सत्कार, सिंधुदुर्गच्या इतिहासातील काळा दिवस' असा उल्लेख करत बॅनरबाजी करण्यात आली आहे.