bala nandgaonkar : राज्याच्या राजकारणात कायमच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? यावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उत्तर दिलं आणि चर्चांना उधान आलं आहे. “साद घातली तर येऊ देत.. मग बघू,” असं शर्मिला ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. (bala nandgaonkar reaction on raj thackeray uddhav thackeray)
दरम्यान, आज यावर बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, यावर भाष्य करणं उचित नाही, हा प्रयोग मी आधी करून बसलोय. दोन ठाकरे एकत्र येण्याबाबत राज ठाकरे स्वतःच बोलतील. पक्ष संघटना, आगामी निवडणुका यावर आज आमची चर्चा झाली आहे. निवडणुकीचा निर्णय अजूनही तळ्यात मळ्यात आहे. राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत राज ठाकरे स्वतःच बोलतील. यावर भाष्य करणं उचित नाही, हा प्रयोग मी आधी करून बसलोच, असंही नांदगावकरांनी स्पष्ट केलं. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान, राज ठाकरे उद्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना संबोधित करून त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती बाळा नांदगावकरांनी दिली. उद्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राज ठाकरे देणार असल्याचीही माहिती यावेळी नांदगावकरांनी दिली.