मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे(raj thackeray) यांनी दिलेल्या भोंग्याविषयीच्या अल्टिमेटने राजकारण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेवरुन त्यांच्यांवर अखेर गुन्हा (Crime filed) दाखल झाला आहे. या सभेत त्यांनी भोंगे काढण्यासाठी 4 मे चे अल्टीमेटम दिले होते. त्यानंतर सकाळची आजन राज्यात बहुतांश ठिकाणी बंद झाली. आता या प्रकरणात राज ठाकरे व मनसे नेते बाळ नांदगावकर (bala nandgaonkar)यांना धमकीचे पत्र आले आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन बाळ नांदगावकर यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, मला आणि राज साहेबांना जीव मारण्याच्या धमकीचे पत्र आले आहे. हे पत्र उर्दू भाषेत असून त्यात मनसेने सुरु केलेल्या भोंगे आंदोलनामुळे तुम्हाला व राज ठाकरे यांना मारण्याची धमकी दिली आहे. तीनचार दिवसापूर्वी लालबागला माझ्या कार्यालयात मला धमकीचं पत्रं आलं होतं. भोंग्याचा विषय झाल्यापासून आम्हाला धमक्या सुरू आहेत. हे पत्र आल्यानंतर काल पोलीस आयुक्त संजय पांडे यांनाही भेटलो होतो. तसेच ज्वॉईंट कमिश्नर वारके यांची भेट घेतली.
...राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही
या संदर्भातच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. हे पत्र कोणाकडून आलंय याबद्दल आम्हाला माहिती नाही. परंतु राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य , केंद्र सरकारनेही घ्यावी आणि त्यांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी आपण गृहमंत्र्यांशी चर्चा केली आहे. ते चांगले गृहमंत्री आहे, ते नक्कीच कारवाई करतील.