मुंबई : प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 2017 सालच्या आंदोलनाच्या प्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना शिक्षा सुनावली आहे. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 353 वरून लक्षवेधी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोर्टाने जामीन दिला आहे. पत्र दिल्यानंतर सामान्य माणसाला सात दिवसात उत्तर दिले पाहिजे. परंतु, एकही उत्तर दिले नाही. कायद्याची ऐशी की तैशी तत्कालीन संबंधित आयुक्ताने केली. हक्काचा निधी खर्च करत नाही म्हणून आंदोलन केले आणि शिक्षा आम्हाला सुनावली. पत्र देऊन पण उत्तर दिले जात नाही. तीन वर्षे निधी खर्च केला नाही. आमचा तत्कालीन आयुक्ताला मारण्याचा उद्देश नव्हता. 3 टक्के निधी खर्च का करत नाही म्हणून आम्ही आलो होतो. 353 चा अतिरेक होत असून अधिकारी याच कवच करत आहे, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला आहे.
मुख्यमंत्री व सर्व आमदार यांना भेटणार आणि या विषयावरून विधान सभेत जाणार आहोत. नेहमी नेहमी धमकी देण्याची गरज काय? आमच्यावर 32 गुन्हे सतत न्यायालयात हजर राहणे कसे शक्य आहे? विधान सभेत जमले तर 353 वरून लक्षवेधी मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काय होते प्रकरण?
निधी खर्च होत नाही म्हणून बच्चू कडू यांच्याकडून जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान बच्चू कडू तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले होते. या प्रकरणी बच्चू कडू यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि दमदाटी करणे असे दोन गुन्हे दाखल होते.