मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केले होते. राज्यभरात अनेक आंदोलनं सुरु होती. काल सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, सरकारने शब्द पाळला नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ताकदीने उभं राहू. 24 तारीख म्हणून सरकारला काम करावं लागेल. सरकारने 24 तास काम करून मराठा समाजाला आरक्षण द्यावंआचार संहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला पाहिजे. 75 वर्षा पासून मराठा समाज उपेक्षित आहे. मराठा कुणबी नाही तर कोण आहे? सरकार विषयी लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. तारखा देताना सरकारवर मनोज जरांगे पाटील यांचा विश्वास नाही. असे बच्चू कडू म्हणाले.