भाजप नेते अमित शाह यांनी मध्यस्थी केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा चिढा सुटला असल्याचे म्हटले जात आहे. शिंदे गटाकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या चार जणांची नावे फिक्स झाली आहेत. नव्या विस्तारात एकूण 10 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.
याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याची माहिती मिळत आहे. आता बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आज पत्रकार परिषद घेत बच्चू कडू म्हणाले की, मी मंत्रिपदाचा दावा आजच सोडणार होतो पण मुख्यमंत्री शिंदेंच्या विनंतीमुळे निर्णय थांबवला आहे. बदलत्या राजकारणाचा कंटाळा आलाय. मुख्यमंत्री शिंदेंनी फोन करुन बोलावलं आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे. 17 जूलैला शिंदेंच्या भेटीनंतर निर्णय घेणार. 18 जूलैला मी माझा अंतिम निर्णय जाहीर करणार. असे बच्चू कडू म्हणाले.
तसेच पद तर देणारच आहेत. 100 टक्के पद देणार. मला खात्री आहे. शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद घेणार नाही माझा ठाम निर्णय आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन मुख्यमंत्री पेचात आहेत. त्यामुळे त्यांना त्रास नको म्हणून मंत्रिपद मागणार नाही. असे बच्चू म्हणाले.