किरीट सोमय्या यांचा खळबळजनक व्हिडीओ लोकशाहीच्या हाती लागला आहे. या व्हिडीओत आक्षेपार्ह स्थितीत सोमय्या दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचे खासगी व्हिडीओ व्हायरल होत असतील तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आता बच्चू कडू यांनी एका माध्यमाला प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, अतिरेक केला की परिणाम भोगावे लागतात. मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही. काही गोष्टी उघड होतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होतात. असे बच्चू कडू म्हणाले.