मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर (MNS GudhiPadwa Melawa) महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संघर्ष पाहायला मिळतोय. तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरूद्ध महाविकासआघाडी (MNS Vs. MVA Goverment) . मेळाव्यातील भाषणामध्ये राज ठाकरेंनी महाविकासआघाडीवर निशाणा साधल्यानंतर मनसे व महाविकास आघाडीतील नेते ह्यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं आहे.
दरम्यान, शरद पावार (Sharad Pawar) ह्यांनी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी नवनिर्वाचित आमदारांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं होतं. त्यावेळी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरीही (Nitin Gadkari) ह्यावेळी उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. तसेच, शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे ह्यांनी 'दिल्लीत काल माझ्या पुतण्याला ED पासून वाचवा अशा आर्त हाका ऐकू आल्या' ह्या शब्दांत टीका केली. तर ह्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) ह्यांनी प्रत्युत्तर देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) ह्यांना टोलाही लगावलाय.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
"कालच्या पवार साहेब आणि पंतप्रधान भेटीवर मनसे नी प्रतिक्रिया दिली आहे असे म्हणतात विस्मृती हि देवानि दिलेली माणसाला सर्वात मोठी देणगी आहे किणी खून प्रकरणात स्वर्गीय बाळासाहेबांना कुठे-कुठे जावे लागले होते हे आमच्या स्मृतीत आहे." असं ट्वीट करत आव्हाडांनी राज ठाकरे व मनसेवर टीका केली.