शस्त्रक्रिया झाल्यानंतर ६ महिन्यांनी मुंबईबाहेर पाऊल टाकलं. हे पहिलं पाऊल मराठवाड्यात टाकलं. आजचा दिवस म्हणजे शिवसेनेने मराठवाड्यात पहिलं पाऊल टाकल्याचा आहे. एवढ्या वर्षांनीही शिवसेनेची ताकद तेवढीच आहे. उलट वाढत आहे. मैदानात बसायला जागा नाही. तुमच्या रुपाने तुळजाभवानीचं रुप पाहतो आहे. असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगबादमधील सभेत वक्तव्य केले. (aurangabad congress ncp min mns rajya sabha election)
बाळासाहेबांनी मुस्लिमांचा द्वेष कधी केला नाही. दुसऱ्या धर्मांचा आदर करणे ही आम्हाला महाराजांनी दिलेली शिकवण आहे. प्रत्येकाने आपला धर्म हा घरात ठेवावा. घराबाहेर पडताना देश हाच आपल्या प्रत्येकाचा धर्म आहे. तसेच काश्मिरी पंडितांनी पुन्हा घरं सोडली आहेत. घरात, शाळेत जाऊन गोळ्या घातल्या जात आहेत. हिंमत असेल तर काश्मिरमध्ये जाऊन हनुमान चालिसा वाचा, मर्द असाल तर पहिले काश्मिरी पंडितांची सुरक्षा करा.
ही शिवसेना बाळासाहेबांची नाही म्हणे, मग कुणाची आहे. उद्धव ठाकरे म्हणून मी शून्य आहे. पण आज बाळासाहेबांमुळेच ही शिवसेना आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. भाजपचा प्रवक्ता देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही, भाजपच्या प्रवक्त्यामुळे आखाती देशांपुढे भारत गुडघ्यावर आला आहे. बाळासाहेब नसते तर तुम्ही दिल्ली काबीज केली असती का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित करत, भाजपवर निशाना साधला.