Aurangabad  Team Lokshahi
राजकारण

सुर्यासारखे तेजस्वी मोदीजी, उद्धव ठाकरे दिवा; बावनकुळेंचा घणाघात

आगामी औरंगाबाद महानगरपालिकेत भाजप, शिंदे युतीचा महापौर

Published by : Sagar Pradhan

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. मात्र, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर विशेष निशाणा साधला. सरकार गेल्याने उद्धव ठाकरे फडफड करत आहेत,उद्धवजी माझा संभाजीनगर येथील बुथप्रमुख पुरेसा. अश्या शब्दात त्यांनी बावनकुळे यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

औरंगाबादेत बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारने दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलून देवगिरी करणाऱ्या निर्णयाचे मी स्वागत करतो.एकनाथ शिंदे एक मर्द मराठा आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आहे. आगामी औरंगाबाद महानगरपालिकेत देखील भाजप शिंदे युतीचा महापौर असेल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले की, सरकार गेल्याने उद्धव ठाकरे फडफड करत आहेत, उद्धवजी माझा संभाजीनगर येथील बुथप्रमुख तुम्हाला पुरेसा आहे. सुर्यासारखे तेजस्वी मोदीजी आणि दुसरीकडे दिवा उद्धव ठाकरे, काय पडणार त्या दिव्याचा उजेड. हम दो हमारे दो असे आता उद्धव ठाकरे यांचे शिल्लक राहतील आणि येणाऱ्या काळात फक्त उरलेल्या 4 जणांचे पोस्टर दिसतील. अश्या शब्दात बावनकुळे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्याला आता युतीतच सर्व निवडणुका लढून पुढे जायचं आहे. पुढच्या काळात सत्ता ही युतीची असेल पण बहुमताने सरकार असेल. भाजपच्या 965 कार्यकर्त्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 50 मतदार कमी करणे आणि भाजप मध्ये आणणे त्या भाजप कार्यकर्त्यांचा मी सन्मान करेल. एकनाथ शिंदे एक मर्द मराठा आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मुख्यमंत्री आहे. अश्या शब्दात त्यांनी शिंदेंचे कौतुक केले आहे.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...