Vaibhav Khedekar Team Lokshahi
राजकारण

Audio : मनसे विभागीय सरचिटणीसांना विदेशातून धमकी

मनसेने मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळेच हा धमकीचा फोन आल्याचा आरोप

Published by : shweta walge

मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांना विदेशातून धमकीचा फोन आला आहे. मनसेने (MNS) मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळेच हा धमकीचा फोन आल्याचा आरोप वैभव खेडेकर यांनी केला आहे. हा फोन परदेशातील क्रमांकावरून आल्याचं वैभव खेडेकर यांनी सांगितलं आहे.

याबाबत ते खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. सुमारे 11 मिनिटे त्या व्यक्तीने खेडेकर यांच्यांशी फोनवर बोलला. यावेळी त्याने वैभव खेडेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप खेडेकर यांनी केला आहे. वैभव खेडेकर यांनी महाआरती आणि मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन केलं होतं. यामुळेच धमकी देणारा फोन आल्याच त्यांचं म्हणणं आहे.

कोण आहेत वैभव खेडेकर

मनसेचे कोकण (Konkan) विभागीय वैभव खेडेकर हे सरचिटणीस आहेत. यापूर्वीही ते अनेक कारणांनी चर्चेत आले आहेत. एखादं आक्रमक आंदोलन किंवा एखाद्या अधिकाऱ्याला मनसे स्टाइलनं दिलेला झटका यामुळे त्यांची चर्चा चांगलीच झाली आहे.

वैभव खेडेकर हे खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. मनसेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांची नोंद आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एप्रिल महिन्यात खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवलं आहे. नगराध्यक्ष पदावर असताना नियमबाह्य काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news