राजकारण

उद्धव ठाकरेंच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवले, कारण...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आजचा दौरा मानापमान नाट्य रंगले आहे. देहू दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बोलू न दिल्याने मोदी टीकेची धनी ठरले आहेत. तर, मुंबईतील विमानतळावरून राजभवनाकडे जाताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना गाडीतून उतरविण्याचा प्रयत्न झाला. यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.

पंतप्रधान मोदी आज देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी मुंबईत दाखल झाले आहे. त्यांचे मुंबई विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले. यानंतर विमानतळाकडून राजभवानाकडे निघताना आदित्य ठाकरेंना गाडीतून उतरविण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षेचे कारण पुढे करुन आदित्य ठाकरेंना गाडीत बसण्यापासून रोखण्यात आले. यावर मुख्यमंत्री चांगलेच संतापले आहेत. तर यामुळे मोदींचा पुन्हा शिवसेनेच्या निशाण्यावर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान,पंतप्रधान मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होतील. या कार्यक्रमाला 6 वाजता सुरुवात होईल. या कार्यक्रमात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका मंचावर उपस्थित राहणार आहेत.

Sanjay Raut On Sharad Pawar: शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत यांचं प्रत्युत्तर

पाकिस्तानी अभिनेत्याच्या 'या' चित्रपटाला मनसेचा विरोध; राज ठाकरेंचा फेसबुक पोस्ट लिहित थेट इशारा

Latur Accident: अंबाजोगाई-लातूर रोडवर भीषण अपघात; चार जण जागीच ठार

Mumbai High Court: मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं सोमवारी भूमीपूजन

वायू प्रदूषण आणि उष्णतेमुळे ब्रेन स्ट्रोकची प्रकरणे वाढली; जगात अशा लोकांची संख्या पोहोचली 1.19 कोटींवर