राजकारण

Assembly Speaker Election : शिवसेनेचा व्हिप बंडखोरांना होणार लागू? एकनाथ शिंदे म्हणाले...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) नामांकन दाखल करण्यात आले असून यासाठी शिवसेनेने (Shivsena) व्हिप जारी केला आहे. परंतु, हा व्हिप आम्हाला लागू नसल्याची प्रतिक्रिय नवर्निवाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार आज गोव्याच्या हॉटेलमधून मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. यासोबत एकनाथ शिंदेंनीही सुरक्षा बाजूला ठेवून आमदारांसोबत प्रवास करत आहेत. ते गोवा विमानतळावर दाखल झाले. आपण सर्व आमदारांना घेऊन मुंबईत जात असल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या व्हिपबद्दल विचारण्यात आले असता व्हिप आमच्यावर लागू होणार नाही. कारण शिवसेनेचे दोन तृतीयांश संख्याबळ आमच्याकडे आहे. आम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहोत, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजसोबत नवीन सरकार स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, त्यांना तीन व चार तारखेला होणाऱ्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यातच आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी भाजपकडून युवा आमदार राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला अर्ज दाखल केला आहे. तर, शिवसेनेच्या व्हिपनुसार जर बंडखोर आमदारांनी मला मतदान केलं नाही. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असे शिवसेना नेते राजन साळवी यांनी म्हंटले आहे.

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड

CM Eknath Shinde: जुहू चौपाटी स्वच्छता मोहिमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Amit Thackeray : सिनेट निवडणूक स्थगितीवरून अमित ठाकरेंची टीका; पोस्ट करत म्हणाले...

Sanjay Raut : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; संजय राऊत म्हणाले...

AFG vs SA ODI: अफगाणिस्तान आफ्रिकेला 134 धावांत गुंडाळून दुसरा सामना 177 धावांनी जिंकला; मालिका 2-0 जिंकले