पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पहिल्या टप्प्यात अनुक्रमे 79.79 आणि 72.14टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. पहिल्या टप्प्याचा प्रचार देखील रंगतदार झाला होता. प्रचारादरम्यान एकमेएकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळाल्या.
पश्चिम बंगाल आणि आसाम यासह केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी येथे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागांसाठी निवडणूक होत असून आज पहिल्या टप्प्यात एकूण 30 मतदारसंघांसाठी मतदान झाले. तर आसाममध्ये पहिल्या टप्प्यात 47 जागांवर मतदान झाले.