राजकारण

आमच्या खोट्या सह्या घेण्यात आल्या; अजित पवारांसोबतचे दोन आमदार बॅक टू पॅव्हेलियन

अजित पवारांच्या बंडानंतर राज्यात आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या आज वेगवेगळ्या ठिकाणी बैठका पार पडणार आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अजित पवारांच्या बंडानंतर राज्यात आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या आज वेगवेगळ्या ठिकाणी बैठका पार पडणार आहेत. यानुसार कोणाकडे किती संख्याबळ आहे याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. अशातच, अजित पवारांच्या शपथविधीला हजर असणारे दोन आमदार आता शरद पवारांकडे परत आले आहे. यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे.

शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये सामील झाल्यानंतर 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे अजित पवार गटाने दावा केला आहे. तर, शरद पवारांनी सर्व आमदार परत येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. यानंतर मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आणि अतुल बेनके हे शरद पवारांच्या शक्तीप्रदर्शनाला हजर होते. यानंतर आता दोन आमदार आज शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले आहेत. किरण लहामटे आणि अशोक पवार हे दोन आमदार अजित पवार यांच्या समवेत राजभवन येथे शपथविधीला सोबत होते. मात्र, आज शरद पवार यांच्या मेळाव्यासाठी वाय बी सेंटर या ठिकाणी दाखल झालेले आहेत.

यादरम्यान राज्यपालांना दिलेले पत्र आम्ही वाचले नव्हते. आमच्या खोट्या सह्या घेण्यात आल्याचा आरोप अशोक पवार यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Amit Thackeray : माहीममधून उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Ashok Hinge: वंचितला मोठा धक्का! विधानसभेच्या तोंडावर अशोक हिंगे यांचा राजीनामा

Shivsena Vidhansabha Candidate: ठाण्यातील शिवसेनेच्या आमदारांचा पत्ता कट?; कोण आहेत ते आमदार ?

Priyanaka Gandhi : प्रियांका गांधी उमेदवारी अर्ज भरणार; पाहा वायनाडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन

Ajit Pawar: ठरलं तर! अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार