राजकारण

कर्नाटक मुख्यमंत्र्यांचे अकाउंट फेक तर ते ट्विट डिलीट का केले नाही; अशोक चव्हाणांचा सवाल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादचा मुद्दा चांगलाच गाजणार आहे. यासंबंधी कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. कर्नाटक मुख्यमंत्र्यांचे अकाउंट फेक आहे तर डिलीट का केले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, कर्नाटक सरकारचा खुलासा फेक अकाउंट असल्याचा निर्वाळा देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पाहिले नाही. फेक ट्विटर अकाउंटचा दावा करत असले तर हे अधिकृत अकाउंट आहे. ट्विटर अकाऊंटचे स्क्रिननशॉट व्हायरल झाले आहेत. हे ट्विट अधिकृत ट्विटर हँडल वरून केलेलं असून अद्यापही हे ट्विट अकाउंटवर आहेत. हे अकाउंट फेक आहे तर डिलीट का नाही केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून लोकांचा गैरसमज तयार करणारी विधाने निर्माण झाली. कर्नाटक सरकारच्या विधानाचे निषेध व्यक्त करत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचा विषय आहे. लोकांच्या भावना व्यक्त करत असताना असे रोखणे योग्य नाही. दोन्ही राज्यांनी सबुरीने घ्यावे. सभागृहात या विषयाची महत्वाता जाणून घेऊ हा मुद्दा घ्यावा. आमची भूमिका सभागृहात गोंधळ घालण्याची नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विटरवरुन महाराष्ट्रातील गावांवर दावा केल्याने सीमावाद चिघळला होता. यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बोम्मई यांची गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीनंतर ते ट्विटर अकाउंट बोम्मई यांचे नसल्याचा दावा करण्यात आला होता.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा