राज्यात मागील काही दिवसांपासून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची प्रचंड चर्चा होत होती. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांना चांगलीच कंबर कसली होती. याच निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यामध्ये कसबामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला तर चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा विजय झाला. परंतु, एकीकडे विजयाचा जल्लोष सुरु होता तर दुसरीकडे भावनिक वातावरण होतं. याच दरम्यान या विजयावर अश्विनी जगताप यांच्या कन्या ऐश्वर्या जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज नवा सूर्य उगवतोय माझ्या आईच्या रुपात
विजयानंतर माध्यमांशी बोलताना ऐश्वर्या जगताप भावनिक झाल्याच्या पाहायला मिळालया. त्या म्हणाल्या की, पप्पांनी केलेल्या कामांची आईने सकाळी सांगतिल्या प्रमाणे ही पावती आहे. त्यांनी काम केलं आहे म्हणूनच लोकांनी हा कौल आमच्या घरातच दिला.हा भारतीय जनता पार्टीला कौल दिलेला आहे. मी मतदानाच्या दिवशीसुद्धा म्हटले होते आमचा सूर्य 3 तारखेलाच मावळलेला आहे. पण अख्खं पिंपरी चिंचवड, सगळे कार्यकर्ते, तसेच आमचा सर्व परिवार, आज नवा सूर्य उगवतोय माझ्या आईच्या रुपात. अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
पुढे त्या म्हणाल्या की, पप्पांना जाऊन पंधराच दिवस झाले होते. त्यानंतर लगेच ही पोटनिवडणूक लागली. जिथे-जिथे जाईल त्या घरी अश्रूच होते. मी त्यांचीही समजूत काढायची. तुम्ही नाही सावरले तर आम्ही कसं सावरणार? त्यांनी केलेल्या कामांवर विश्वास होता. त्यांची कामे पुढे न्यायची आहेत हा लोकांवर आमचा विश्वास होता. वडिलांची आठवण क्षणोक्षणी राहणारच. वडील गेल्यानंतर आई सर्व सांभाळते.ती कधी वडीलही होते आणि आईचीदेखील भूमिका पार पाडते. आता पप्पांची स्वप्न पूर्ण करावीत हेच ध्येय आहेत. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.